स्थापना : श्रमस्य प्रतिष्ठा करौ च बलम् या ब्रिदासह खामगांव अर्बन को - ऑप. बँकेची स्थापना - 4 आक्टोंबर 1963 विजयादशमीचे मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांनी केली़. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़. मा. गो. सावजी होते़. केवळ रु़. 25,000/- चे भाग भांडवलावर समाजातील दुर्बल तसेच उपेक्षीत आणि मध्यम वर्गीय पांढरपेशा समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी रा़. स्व़. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी ही बँक सुरु केली़. सन 1963 मध्ये लावलेल्या या इवल्याश्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला असून, सभासद संख्या 95000 चे वर आहे़ बँकेने सन 2013 मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे़. खामगांव सारख्या तालुका स्तरावर स्थापन झालेल्या व बहुतांश शाखा ग्रामिण भागात असलेल्या या बँकेने शेडयूल्ड बँकेचा दर्जा दि़ 22/05/1999 रोजी व मल्टीस्टेट बँकेचा दर्जा दि़ 12/07/2000 रोजी मिळवून देशपातळीवर सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे़. बँकेने आर्थिक प्रगती सोबतच सामाजीक क्षेत्रातही मोठे काम करुन सहकाराच्या तत्वाचे सुरुवाती पासूनच पालन केले आहे़.
सामाजीक बांधीलकी :
केवळ नफा कमाविणे हा उद्देश न ठेवता बँकेने सामाजीक बांधीलकी जोपासत सामाजीक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे़. भुकप ग्रस्त, पुर ग्रस्त, अवर्षण अशा नैसगीक आपत्ती मध्ये नेहमी बँक पिडीतांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहीली़. कारगील युध्दातील शहीदांचे वारसांना मदत केली़ तसेच आदिवासी क्षेत्रात सुध्दा वनवासी बांधवांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी बँकेने वेळोवेळी मदत केली आहे़. दिव्यांग बांधवांसाठी विविध शिबीरे आयोजीत करुन तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादी प्रकारची मोठी आर्थिक मदत केली आहे. समाजात चांगले क्रिडापटू निर्माण व्हावे म्हणून विविध खुल्या क्रिडा स्पर्धांना प्रोत्साहन, शेतकरी बांधवांना अल्पदरात कर्ज वाटप, विविध समाजातील धार्मिक कार्यक्रमात मदत, श्रीगणेश विर्सजनाचे वेळी सर्व गणेश भक्तांना चहापान मोफत, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे़, भारत सरकारचे आवाहनानुसार बेटी बचाव, स्वच्छता अभीयान, रक्तदान शिबीर अशा कार्यात बँक सदैव सक्रिय असून, सभासदांना बॅग्स्, निशुल्क दिनदर्शिका वितरण अशा अनेक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेवून बँकेने आपली समाजातील बांधीलकी जोपासली आहे.
Read more: दि खामगांव अर्बन को - ऑप. बँक