- Covid 19 - Important Notice for Bank Customers


Never click on unknown links or install applications from unknown sources. We, Never Asks your Debit Card Number, CVV, PIN, Passowrd, OTP, IMPS MPIN, UPI PIN etc. Dont share details with anyone.


स्थापना : श्रमस्य प्रतिष्ठा करौ च बलम् या ब्रिदासह खामगांव अर्बन को - ऑप. बँकेची स्थापना - 4 आक्टोंबर 1963 विजयादशमीचे मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांनी केली़. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़. मा. गो. सावजी होते़.  केवळ रु़. 25,000/- चे भाग भांडवलावर समाजातील दुर्बल तसेच उपेक्षीत आणि मध्यम वर्गीय पांढरपेशा समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी रा़. स्व़. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी ही बँक सुरु केली़.  सन 1963 मध्ये लावलेल्या या इवल्याश्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला असून, सभासद संख्या 95000 चे वर आहे़ बँकेने सन 2013 मध्ये सुवर्ण  महोत्सवी वर्ष साजरे केले आहे़.  खामगांव सारख्या तालुका स्तरावर स्थापन झालेल्या व बहुतांश शाखा ग्रामिण भागात असलेल्या या बँकेने शेडयूल्ड बँकेचा दर्जा दि़ 22/05/1999 रोजी व मल्टीस्टेट बँकेचा दर्जा दि़ 12/07/2000 रोजी मिळवून देशपातळीवर सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे़.  बँकेने आर्थिक प्रगती सोबतच सामाजीक क्षेत्रातही मोठे काम करुन सहकाराच्या तत्वाचे सुरुवाती पासूनच पालन केले आहे़.

सामाजीक बांधीलकी  :

       केवळ नफा कमाविणे हा उद्देश न ठेवता बँकेने सामाजीक बांधीलकी जोपासत सामाजीक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे़.  भुकप ग्रस्त, पुर ग्रस्त, अवर्षण अशा नैसगीक आपत्ती मध्ये नेहमी बँक पिडीतांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहीली़.  कारगील युध्दातील शहीदांचे वारसांना मदत केली़ तसेच आदिवासी क्षेत्रात सुध्दा वनवासी बांधवांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी बँकेने वेळोवेळी मदत केली आहे़.  दिव्यांग बांधवांसाठी विविध शिबीरे आयोजीत करुन तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादी प्रकारची मोठी आर्थिक मदत केली आहे.  समाजात चांगले क्रिडापटू निर्माण व्हावे म्हणून विविध खुल्या क्रिडा स्पर्धांना प्रोत्साहन, शेतकरी बांधवांना अल्पदरात कर्ज वाटप, विविध समाजातील धार्मिक कार्यक्रमात मदत, श्रीगणेश विर्सजनाचे वेळी सर्व गणेश भक्तांना चहापान मोफत, शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे़,  भारत सरकारचे आवाहनानुसार बेटी बचाव, स्वच्छता अभीयान, रक्तदान शिबीर अशा कार्यात बँक सदैव सक्रिय असून, सभासदांना बॅग्स्, निशुल्क दिनदर्शिका वितरण अशा अनेक कार्यक्रमात  सक्रिय सहभाग घेवून बँकेने आपली समाजातील बांधीलकी जोपासली आहे.  

मनुष्यबळ विकास :

       आधुनिक काळातील वाढत्या स्पर्धेच्या युगात बँकेने ग्राहक सेवेला अत्यंत महत्व दिले आहे.  बँकींग व्यवसाय हा बहुमागी व विविध क्षेत्रांशी निगडित असा असल्याने बँकींग व्यवसाय वृध्दिसाठी प्रशिक्षण वर्गाद्वारे कर्मचार्यांचे बँकींग क्षेत्रातील महत्वांच्या जे.ए.आय.आय.बी, सी.ए.आय.आय.बी परीक्षा, तसेच कर्मचार्यांचे विविध क्षेत्रातील बौध्दीक ज्ञान कौशल्य, क्षमता विकास, नेतृत्व विकास, व्यक्तीमत्व विकास, कायदे विषयक ज्ञान व सुप्त गुण यांच्या विकासासाठी आवश्यक ती संसाधने उपलब्ध करुन देणे हेच बँकींग व्यवसायातील मनुष्यबळ विकासाचे मुख्य सुत्र असून, अशा प्रकारचे कर्मचार्यांना प्रशिक्षण देवून प्रशिक्षीत केले आहे़ आणि आवश्यक पदांवर बँकींग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची नव नियुक्ती करुन व्यावसायीक धोरण अवलंबले आहे व आर्थिक प्रगती साध्य केली आहे.

बँकेच्या प्रगतीची ठळक वैशिष्टे :  

  • बँकेस 22 मे 1999 रोजी शेडयूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाला.
  • 12 जुलै 2000 रोजी मल्टीस्टेट शेडयूल्ड दर्जा प्राप्त झाला.
  • बर्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे शाखा स्थापन.
  • व्यवसाय वाढीच्या दृष्टीने मार्केट एरीयामध्ये बँकेच्या शाखांचे स्थानांतरण केले.
  • नविन संचालक मंडळाची निवड :- १४/०२/२०२४, मा. श्री. प्रा. विजय श्रीराम पुंडे , बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून निवड.
  • सलग 13 वर्षे ऑडीट वर्ग अ.
  • कोअर बँकींग प्रोजेक्ट पुर्ण.
  • ए. टी. एम. सेवा उपलब्ध
  • मोबाईल बँकींग सेवा उपलब्ध.
  • यु.पी.आय सेवा उपलब्ध.
  • नेट बँकींग सेवा देण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत़.

   बँकेच्या खातेधारकांसाठी KYC संबंधित आवश्यक सूचना
भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार बँकेला त्यांच्या ग्राहकांचा केवायसी (Know Your Customer) संबंधाने रेकॉर्ड वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे केवायसी (KYC) आणि प्रोफाईल् (Profile) अद्ययावत करण्याचे दृष्टीने त्यांच्या ओळखीचा पुरावा, पत्याच्या पुरावा (जसे आधार कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड) व पासपोर्ट आकाराचा नवीनतम फोटो बँकेकडे त्वरित जमा करावा.
बचत तसेच चालू खात्यावर 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता ग्राहक तसेच त्रयस्थ पक्षाद्वारे जमा (Credit) अथवा नावे (Debit) कुठलाही व्यवहार झालेला नसल्यास अशी बचत अथवा चालू खाती निष्क्रिय (Dormant) समजण्यात येतात. सबब ज्या ग्राहकांचे खाते व्यवहार न केल्यामुळे निष्क्रिय (Dormant) झाले असेल त्यांनी त्यांचे खाते सक्रिय (Active) करण्याकरिता नवीनतम फोटो आणि वरीलप्रमाणे कागदपत्रे संबंधित शाखेच्या शाखाधिकाऱ्यांकडे सादर करावी. सोबत इतर तपशील (मोबाईल नं., ईमेल आयडी) देऊन खाते अद्ययावत करुन घ्यावी.
विहीत कालावधीत उपरोक्तप्रमाणे खातेदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास केवायसी पूर्तता न झालेली सर्व खाती आणि निष्क्रिय खाती बँकेद्वारे गोठविण्यात (Credit & Debit Freeze) येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
आपणांस उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

© - The Khamgaon Urban Co-oprative Bank