भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार बँकेला त्यांच्या ग्राहकांचा केवायसी (Know Your Customer) संबंधाने रेकॉर्ड वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे केवायसी (KYC) आणि प्रोफाईल् (Profile) अद्ययावत करण्याचे दृष्टीने त्यांच्या ओळखीचा पुरावा, पत्याच्या पुरावा (जसे आधार कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड) व पासपोर्ट आकाराचा नवीनतम फोटो बँकेकडे त्वरित जमा करावा.
बचत तसेच चालू खात्यावर 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता ग्राहक तसेच त्रयस्थ पक्षाद्वारे जमा (Credit) अथवा नावे (Debit) कुठलाही व्यवहार झालेला नसल्यास अशी बचत अथवा चालू खाती निष्क्रिय (Dormant) समजण्यात येतात. सबब ज्या ग्राहकांचे खाते व्यवहार न केल्यामुळे निष्क्रिय (Dormant) झाले असेल त्यांनी त्यांचे खाते सक्रिय (Active) करण्याकरिता नवीनतम फोटो आणि वरीलप्रमाणे कागदपत्रे संबंधित शाखेच्या शाखाधिकाऱ्यांकडे सादर करावी. सोबत इतर तपशील (मोबाईल नं., ईमेल आयडी) देऊन खाते अद्ययावत करुन घ्यावी.
विहीत कालावधीत उपरोक्तप्रमाणे खातेदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास केवायसी पूर्तता न झालेली सर्व खाती आणि निष्क्रिय खाती बँकेद्वारे गोठविण्यात (Credit & Debit Freeze) येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
आपणांस उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.